Surprise Me!

Satara | सिध्दनाथाच्या रथ मिरवणुकीस शासनाची परवानगी | Sakal Media |

2021-12-04 639 Dailymotion

ओमिक्रॉन (कोरोना) विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या संकटामुळे देवदिवाळीस रविवारी (ता. ५) येथील श्री सिध्दनाथ देवस्थानची रथ मिरवणुकीसह भरणारी यात्रा रद्द करण्यात आलीय. मात्र, स्थानिक पातळीवर रथ मिरवणुकीची नगरप्रदक्षिणा न घालता फक्त यात्रा मैदानातच रथ मिरवणुकीस परवानगी दिली. लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रध्दास्थान असलेले येथील श्री सिध्दनाथ-देवी जोगेश्वरी देवस्थानच्या शाही मंगल विवाह सोहळ्याची सांगता सुमारे पाच लाख भाविकांच्या उपस्थितीत प्रत्येक वर्षी केली जाते. देवदिवाळीस रथ मिरवणुकीने यात्रा करण्याची परंपरा आहे. गेल्या वषीर्ही कोरोनाच्या संसर्गामुळे येथील वार्षिक यात्रा व रथोत्सव रद्द करण्यात आला होता. त्यानंतर काही महिने मंदिरही भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान, मिरवणुकीस बाहेरगावच्या भाविकांना म्हसवड व यात्रा मैदानात प्रवेश बंदी केली असून मैदानात विविध व्यावसायिकांना दुकाने थाटण्यास बंदी कायम ठेवली आहे. (व्हिडिओ : सल्लाउद्दिन चोपदार)
#satara #mhsavad #sidhanath #temple #maharastra #sakal